डॉ. बी. आर. आंबेडकर रोडवर नवा फलक बसविण्याची मागणी

बेळगाव : राणी चन्नम्मा सर्कलमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या परिसरात जिल्हाभरातून शेकडो लोक येत असतात. त्यांना अनुकूल होण्यासाठी महापालिकेकडून डॉ. बी. आर. आंबेडकर रोड असा फलक लावण्यात आला आहे. मात्र या फलकाची अत्यंत दयनीय अवस्था असून फलक पूर्णपणे जीर्ण झाला आहे. यामुळे नागरिकांना समस्या निर्माण होत आहे. यासाठी महापालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी नवीन फलक बसवावा, अशी मागणी भारतीय सामाजिक परिवर्तन मंचाच्यावतीने करण्यात आली.
याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांना देण्यात आले. निवेदनात, या जीर्ण फलकाबाबत अनेकवेळा निवेदन देण्यात आले तरी याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अवघ्या काही दिवसांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव होणार आहे. यासाठी महापालिकेने या फलकाचे निरीक्षण करून तपासणी करावी. तसेच याठिकाणी नवीन फलक बसवून नागरिकांना अनुकूल करून द्यावा. त्याचबरोबर या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
Source link



