Uncategorized

वेर्लेची वेदा राऊळ सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत प्रथम

सलग दोनवेळा इस्रो विमान सफरीसाठी संधी

सावंतवाडी । प्रतिनिधी

सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी आणि वेर्ले गावची सुकन्या कु .वेदा राऊळ हिने सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून आपल्या आईवडिलांचे व प्रशालेचे नावलौकिक वाढवलेले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गतवर्षी इयत्ता सहावीमध्ये देखील सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत टाॅप फाईव्ह मध्ये तिची निवड झाली होती. व तिला इस्रो विमान सफरीसाठी संधी मिळाली होती. यावर्षी देखील तिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावीत सलग दोन वर्ष सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत यश मिळविण्याचा मान पटकाविला आहे .वेदा राऊळ हिला तिच्या आईवडिलांसह जि. प. शाळा निरवडे नं 1मध्ये कार्यरत उपशिक्षिका सौ. प्रज्ञा राऊळ व पंचायत समिती सावंतवाडी येथील वरिष्ठ सहाय्यक प्रविण राऊळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​