Uncategorized

तरुण भारत–लोकमान्य ‘स्नेहमेळाव्यास’ आजपासून प्रारंभ

डॉ. किरण ठाकुर यांच्या अमृतमहोत्सव पदार्पण वर्षानिमित्त सांगली येथे तीन दिवस कार्यक्रम : हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

   त. भा.प्रतिनिधी/ सांगली :

समाजातील विधायकतेला प्रोत्साहन देणारे, माणसांच्या शक्तीचे चळवळीत रुपांतर करून देशकार्यात त्या शक्तीला परावर्तीत करण्याचे कार्य करणारे तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर हे मंगळवार दि. 7 एप्रिल रोजी वयाची 74 वर्षे पूर्ण करून 75 व्या अर्थातच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने दि. 5, 6 व 7 एप्रिल म्हणजे रविवार, सोमवार व मंगळवार असा ‘स्नेहमेळावा’ सांगली नगरीत साजरा होत असून त्याचा प्रारंभ आज रविवारी सायंकाळी होत आहे.

स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सांगली-मिरज मार्गावरील चिंतामणराव व्यापार महाविद्यालय शेजारील कांतीलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशालेचे मैदान सजले आहे. हजारो सांगलीकरांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गौरव सोहळ्याला शोभा आणावी, असे आवाहन तरुण भारत, लोकमान्य परिवार तसेच गौरव समितीचे अध्यक्ष, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

असा असेल स्नेह मेळावा

आज शिवप्रताप : रविवार दि. 5 एप्रिल सायंकाळी 5 वाजल्यापासून हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आयोजित विशेष कार्यक्रम ‘शिवप्रताप’

सोमवारची सायंकाळ सावनी रवींद्र यांच्या गीत मैफलीची

‘नवरी आली….’, ‘उदो अंबाबाईचा’ अशा विविध गाण्यांनी मंत्रमुग्ध करण्याऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रवींद्र यांची गीत मैफल. वेळ सायंकाळी 5 पासून.

डॉ. किरण ठाकुर यांचा मंगळवारी नागरी सत्कार

मंगळवार दि. 7 एप्रिल रोजी तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांचा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते नागरी सत्कार. यावेळी मान्यवर सांगलीकरांचा सत्कार सोहळा. प्रमुख उपस्थिती माजी मंत्री जयंतराव पाटील, खासदार विशाल पाटील व मान्यवर.

रात्री म्युझिकल ऑर्केस्ट्रा कार्यक्रम.

डॉ. किरण ठाकुर यांचा 7 रोजी 74 वा वाढदिवस सोहळा

मंगळवार दि. 7 एप्रिल रोजी ‘तरुण भारत संवाद’चे सांगली जिह्यातील शेकडो वाचक, हितचिंतक आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-

ऑप. सोसायटीचे ठेवीदार, सभासद व ग्राहक हे तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांना 74 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी पुण्यातील कलावैभव संस्थेतर्फे होणाऱ्या रणवाद्यांच्या वाद्यमेळ्याचा अफलातून आविष्कार पहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​