निरवडे महोत्सचा विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ

न्हावेली /वार्ताहर
निरवडे ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ, माळकरवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य “निरवडे महोत्सव २०२६” ची जल्लोषात सुरुवात झाली. आकर्षक फूड फेस्टिवल आणि रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीमुळे हा महोत्सव निरवडेवासीयांसाठी एक आनंदाची पर्वणी ठरला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब यांच्या हस्ते झाले.यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर,पंचायत समिती सभापती सौ.सुष्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य संदीपजी गावडे, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक तसेच कणकवली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संदेशजी पारकर ,प्रमोद गावडे,सदा गावडे,सरपंच सौ.सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर संजय तानावडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर एकत्र आल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली. या महोत्सवाच्या माध्यमातून निरवडे गावच्या कला व संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी सर्वपक्षीय सकारात्मक सहकार्य मिळणार असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि आकर्षक पद्धतीने करण्यात आले असून त्याबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी केतन आजगावकर,महेंद्र गावडे,दादा परब,निखिल माळकर,सुनिल माळकर,चंदन गोसावी, तिवरेकर सर,तसेच इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.चविष्ट खाद्यपदार्थांचा फूड फेस्टिवल आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले असून नागरिकांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
Source link



