Uncategorized

शहापूर घरफोडीत परप्रांतीय गुन्हेगार?

800 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी : 64 लाख रुपये किंमत, सीसीटीव्ही फुटेजवरून तपास

बेळगाव : लक्ष्मी रोड, भारतनगर-शहापूर येथील पाऊण कोटीच्या घरफोडीनंतर परिसरात खळबळ माजली आहे. शहापूर पोलीस स्थानकापासून जवळच ही घटना घडली आहे. बंद घराच्या उजव्या बाजूचा दरवाजा फोडून चोरट्यांनी तब्बल 800 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले असून गुन्हेगार परप्रांतीय असावेत, असा संशय आहे. बेळगावमध्ये सध्या चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. स्थानिक गुन्हेगारांबरोबरच वेगवेगळ्या राज्यातील गुन्हेगारांची धरपकड करण्यात येत आहे. खासकरून महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आदी विविध राज्यातील गुन्हेगार बेळगावात सक्रिय असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. गुन्ह्याच्या कार्यपद्धतीवरून गुन्हेगार कोण? याची माहिती मिळविली जाते.

शहापूर येथील कल्पना यल्लुशेठ काटवा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री उशिरा अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी रोड, भारतनगर-शहापूर येथील मेघदूत हाऊसिंग कॉलनी येथील बंद घराच्या उजव्या बाजूचा दरवाजा तोडून चोरट्यांनी बेडरूममध्ये प्रवेश केला. बेडरूमला लावलेले कुलूप फोडून 800 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले आहेत. कौटुंबिक कार्यक्रमासाठी कल्पना व त्यांचे कुटुंबीय 28 मार्च रोजी सकाळी 8 वाजता आपल्या घराला कुलूप लावून हुबळीला गेले होते. गुरुवार दि. 2 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजता त्या घरी परतल्या. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी मंगळसूत्र, सोन्याची नाणी, चेन, वाकी, लहान मंगळसूत्र, बांगड्या, अंगठ्या, नेकलेस, लांब नेकलेस, पाचपदरी चेन, सोन्याचे बिस्कीट, कर्णफुले आदी 64 लाख 7 हजार 500 रुपये किमतीचे 800 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले आहेत.

चोरट्यांचा माग काढण्यासाठी शहापूर पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या घटनेमागे परप्रांतीय गुन्हेगारांची टोळी सक्रिय असावी, असा संशय बळावला असून त्या दिशेने तपासाची चक्रे फिरविण्यात आली आहेत. परराज्यातही तपास करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेऊन बारकाईने तपासण्यात येत आहेत. प्रत्यक्षात चोरी कधी झाली? याचा उलगडा झाल्याशिवाय गुन्हेगार कोण? याचा शोध घेणे तपास अधिकाऱ्यांना कठीण जाणार आहे. 28 मार्चच्या सकाळी 8 पासून 2 एप्रिलच्या दुपारी 12.30 या वेळेत पाच दिवसांच्या कालावधीत नेमकी चोरी कधी झाली? याची माहिती मिळविण्यात येत आहे. यासाठी फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. तब्बल पाऊण किलो सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्यामुळे हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही गांभीर्याने घेतले आहे.

‘लॉक्ड हाऊस बिट’कडे दुर्लक्षच : पोलीस आयुक्त

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या पुढाकारातून लॉक्ड हाऊस बिट व्यवस्था 26 जानेवारीपासून सुरू आहे. आपल्या घराला कुलूप लावून परगावी जाताना जवळच्या पोलीस स्थानकाला माहिती द्या किंवा या उपक्रमासाठीच उपलब्ध असलेल्या स्वतंत्र मोबाईल क्रमांकावर आपल्या घराचे लोकेशन शेअर करून आम्हाला माहिती द्या. घर किती दिवस बंद असणार आहे, हे तपासून त्या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात येईल, असे वारंवार आवाहन करूनही परगावी जाताना अनेकजण  या उपक्रमाकडे दुर्लक्ष करत आहेत. शहापूर येथील घटना तर पोलीस स्थानकापासून जवळच घडली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​