‘मालवण’ नौकेचे केरळमध्ये जलावतरण

पाणबुडीविरोधी नौका : नौदल शक्तीत मोलाची भर
वृत्तसंस्था / कोची
‘मालवण’ या उथळ पाण्यात कार्यरत राहणाऱ्या पाणबुडीविरोधी युद्ध नौकेचे जलावतरण करण्यात आले आहे. ही नौका केरळच्या कोची येथील नौदल तळावर नौदलाच्या सुपूर्द करण्यात आली. हा शानदार कार्यक्रम मंगळवारी पार पडला. या नौकेची निर्मिती कोचीन येथील नौदल तळावर करण्यात आली आहे. ही अशा प्रकारची द्वितीय भारतीय नौका असून या मालिकेत आणखी सहा नौकांची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय नौदलाकडून देण्यात आली आहे.
ही संपूर्णपणे स्वदेशनिर्मित युद्धनौका आहे. तिची निर्मिती भारतीय नौदलाच्या अपेक्षांच्या अनुसार करण्यात आली आहे. तसेच तिची निर्मिती करताना ‘डीएनव्ही’ च्या निकषांच्या उपयोग करण्यात आला आहे. ती अत्याधुनिक असून तिच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात मोलाची भर पडून त्याची मारक क्षमता आणि संरक्षण क्षमता या दोन्हीमध्ये मोठी प्रगती होईल, असे स्पष्ट करण्यात आले.
‘मालवण’ हे नाव का…
मालवण या नावाचा संबंध भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे संरक्षण आणि विस्तार यासाठी नौदलाची निर्मिती केली होती. जंजिऱ्याच्या सिद्दीकडून होणारा त्रास संपवून कोकणच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी मालवण येथे सागरी दुर्गाची निर्मिती केली होती. आजही हा गड आहे. या गडामुळे मालवण हे नाव भारताच्या सागरी सामर्थ्य क्षेत्रात प्रसिद्ध झाले. त्यामुळे या नौकेचे नामकरण ‘मालवण’ असे करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने या नौकेची निर्मिती झाली आहे.
नौदलावर विशेष लक्ष
गेल्या 11 वर्षांमध्ये भारताने आपले नौदल सामर्थ्य वृद्धिंगत करण्यावर विशेष भर दिला आहे. अनेक पाणबुड्या, आण्विक पाणबुड्या, युद्धनौका आणि पाणबुडीविरोधी नौका भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कोचीन येथील तळावर निर्माण करण्यात आलेली ही अशा प्रकारची द्वितीय नौका आहे.
‘मालवण’ची वैशिष्ट्यो
ड लांबी : साधारणत: 80 मीटर, रुंदी साधारणत: 25 मीटर
ड वजन : साधारणत: 1 हजार 100 टनापेक्षाही अधिक
ड सामग्री : अंडरवॉटर सर्व्हेलन्स व्यवस्था, पाणबुडीविरोधी शस्त्रास्त्रे
ड स्फोटके : वॉटरजेट प्रोपेल्ड पाणसुरुंग, बहुउद्देशीय अग्निबाण
ड संपर्क साधने : अत्याधुनिक सेन्सर्स, आधुनिक रडार्स, सोनार उपकरणे
ड निर्मिती : 80 टक्के प्रमाणात भारतीय साधने, काही विदेशी साधने
Source link



