Uncategorized

Gram Panchayat Apang Yojana Nidhi — महाराष्ट्र योजना

नमस्कार दिव्यांग मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून दिव्यांग बांधवांसाठी म्हणजेच अपंग व्यक्तीसाठी विविध प्रकारच्या शासकीय योजना राबविण्यात येतात. राज्य शासनाच्या विविध योजनांपैकी ग्रामस्थारावरील एक महत्त्वाची योजना म्हणजे ग्राम पंचायत अपंग योजना होय. सदर योजनेच्या माध्यमातून गावातील अपंग व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वउत्पन्नातील राखून ठेवलेला 3% ग्रामपंचायत निधी दिला जातो.

ग्राम पंचायत अपंग योजना

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी सन 2001 च्या अपंग कल्याणकृती आराखड्यातील अनुक्रमांक 9 मधील सूचनेनुसार त्यांच्या स्वउत्पन्नातील एकूण निधीपैकी 3 टक्के निधी विविध गावातील दिव्यांग व्यक्तींना कल्याण व पुनर्वसनाकरिता राखून ठेवून खर्च करावा. याबाबत ग्रामविकास विभागाने संदर्भातील क्रमांक 1,2,5 व 6 च्या आदेशान्वये शासन निर्णय निर्गमित केले आहेत.

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत) अंतर्गत अपंग लाभार्थी व्यक्तींना विविध योजनांसाठी, स्वउत्पन्नातील तीन टक्के निधी राखून ठेवण्यात येतो. या निधीचा उपयोग लाभार्थ्यांना वस्तू स्वरूपात अनुदानाचे वाटप करण्यात व निधी रक्कम त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यासाठी राखून ठेवण्यात येते. मात्र बऱ्याच वेळी अपंगांना देण्यात येत असलेल्या वस्तूंचा दर्जा योग्य नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधीकडून करण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायत अपंग निधी वाटपाच्या अटी व शर्ती

अपंग लाभार्थी व्यक्तींच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यासंदर्भात 24 नोव्हेंबर 2015 च्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे काही महत्त्वपूर्ण अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत, त्याची कार्यवाही संबंधित विभागाकडून करणे आवश्यक आहे.

  • शासन निर्णयासोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील अर्ज ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षम प्राधिकार्‍याने निवड केलेल्या लाभार्थ्यांकडून भरून घ्यावा.
  • शासन निर्णय सोबत जोडण्यात आलेला विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त झाल्यानंतर, अर्जामध्ये नमूद करण्यात आलेल्या वस्तू/साहित्याची किंमत विहित पद्धतीने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित करावी.
  • ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सक्षम प्राधिकरणांची मान्यता घेण्यात यावी.
  • सक्षम प्राधिकरणांच्या मान्यतेनंतर वस्तू/साहित्याची खरेदी न करता निश्चित करण्यात आलेल्या रकमेचे अनुदान जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांनी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करावी.
  • अपंग लाभार्थी वास्तव्यास असलेल्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांनी अपंग लाभार्थ्यास दिलेल्या लाभाबाबतचा अहवाल ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला सादर करावा.

अपंग योजना फॉर्म

संबंधित शासन निर्णयामध्ये फक्त वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठीचा लाभार्थ्यांकडून भरून घ्यावयाचा फॉर्म म्हणजेच अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे. अर्जाचा नमुना तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता. अर्जामध्ये अपंग लाभार्थ्यांचे नाव, अपंगत्वाचे प्रमाण, बँक खाते क्रमांक, आधारकार्ड क्रमांक इत्यादी माहिती भरावयाची आहे.

📢 हे पण वाचा भाऊ : दिव्यांगासाठी पाच लाखापर्यंत कर्ज देणारी मुदत कर्ज योजना

ग्रामपंचायत Apang Nidhi मिळवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना कोणताही अपंग योजना ऑनलाईन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. यासाठी गावातील संबंधित ग्रामसेवक यांना संपर्क साधून ग्रामपंचायत 3% निधी बाबतची चौकशी करावी.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​