Navinya Purna Yojana 2023-24 — महाराष्ट्र योजना

महाराष्ट्र राज्यातील पशुपालकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा पशुपालकांना शासनाकडून 75 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचा वाटप केलं जाणार आहे. यासाठी नाविन्यपूर्ण योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. आज आपण सदर लेखाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ज्यामध्ये नाविन्यपूर्ण योजना काय आहे? पात्रता, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे कोणती लागतील? अर्ज कसा करावा इत्यादीचा समावेश असेल.
Navinya Purna Yojana काय आहे ?
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून राज्यातील शेतकरी व पशुपालकांसाठी एक महत्त्वकांक्षी राबविण्यात येणारी योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना होय. सदर योजनेच्या माध्यमातून पात्र व गरजू लाभार्थी शेतकऱ्यांना, पशुपालकांना, पशुसंवर्धकांना गाय, म्हैस, शेळीपालन, कुक्कुटपालन इत्यादी विविध बाबीसाठी 75 टक्के अनुदान दिलं जातं. नाविन्यपूर्ण योजना अनुदान मिळवण्यासाठी अर्जदारांना ऑनलाईन विहित नमुन्यातील अर्ज भरावा लागतो.
नाविन्यपूर्ण योजना मुख्यत्व दोन प्रकारात मोडली जाते. यामध्ये पहिला गट म्हणजे राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना व दुसरा गट जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना. पहिल्या गटामध्ये गाय, मेंढीपालन, शेळीपालन यासाठी राज्यस्तरीय योजना राबविले जाते, तर याउलट दुसऱ्या गटांमध्ये विविध 23 योजना व उपघटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. जी जिल्हास्तरीय योजना म्हणून राबविली जाते.
योजना संपूर्ण नाव | नाविन्यपूर्ण योजना |
विभाग | पशुसंवर्धन विभाग |
लाभार्थी राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी वर्ग | शेतकरी, पशुपालक |
लाभस्वरूप | 75 टक्के अनुदान |
अधिकृत वेबसाईट | ah.mahabms.com |
नाविन्यपूर्ण योजनेसाठी पात्रता (eligibility)
- अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असावा.
- अर्जदार अत्यल्पभूधारक शेतकरी असावा. (1 हेक्टर मर्यादा)
- अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 1 ते 2 हेक्टर मर्यादा)
- अर्जदार सुशिक्षित बेरोजगार असावा व त्यांनी रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी केलेली असावी.
- महिला बचत गटातील लाभार्थी
नाविन्यपूर्ण योजना GR
नाविन्यपूर्ण योजनासंदर्भातील शासनाकडून आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेल्या संपूर्ण शासन निर्णयाची यादी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ah.mahabms.com या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर तपशील या टॅबअंतर्गत विविध राज्य व जिल्हास्तरीय योजना देण्यात आलेल्या आहेत. त्याखालील शासन निर्णय (GR) पहा या लिंकवर क्लिक केल्यानंतर संबंधित शासन निर्णय आपल्याला पाहता येईल.
📣 हे पण वाचा : राष्ट्रीय पशुधन अभियान योजना, पडीक जमिनीत वैरण पिकवा 100% अनुदान मिळवा
Navinya Purna Yojana Documents (कागदपत्रे)
- फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
- शेतजमिनीचा सातबारा उतारा
- शेतजमिनीचा 8अ उतारा
- अपत्य दाखला/स्वयंघोषणापत्र
- अर्जदारांचा आधारकार्ड
- सातबारामध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबातील व्यक्तींचा संमतीपत्र अथवा भाडेतत्त्वावरील करारनामा
- अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग असल्यास जातीचा दाखला
- रहिवाशी दाखला
- दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स
- दिव्यांग असल्यास दाखला
- बचत गट सदस्य असल्यास बचतगट प्रमाणपत्र, पासबुक झेरॉक्स
- वयाचा दाखला
- रेशनकार्ड/कुटुंब प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रता कागदपत्र
- रोजगार स्वयरोजगार कार्यालयाकडे नोंदणी केल्यास सत्यप्रत
- प्रशिक्षण घेतलेला असल्यास प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक
या जिल्ह्यांसाठी लाभ नाही
सामान्यतः राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभागाची नाविन्यपूर्ण योजना राबविले जाते; परंतु यामध्ये काही शहरी भागातील जिल्ह्यांचा समावेश नाकारण्यात आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्हे या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत. यामध्ये अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, सातारा इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शेळी-मेंढी पालनासाठी मुंबई व मुंबई उपनगर सोडून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जाते.
खालील घटकासाठी अर्ज सुरू
जिल्हास्तरीय | राज्यस्तरीय |
---|---|
दुधाळ गाई म्हैस वाटप | दुधाळ गाय म्हैस वाटप |
शेळी मेंढी गट वाटप | शेळी मेंढी गट वाटप |
तलंगा गट वाटप करणे | 1000 मासाल कुकूट पक्षी |
एका दिवशीय सुधारित पक्षांचे गट वाटप |
अनुदान किती मिळणार ?
सर्व प्रवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. सदर योजनेकरिता अनुसूचित जाती व जमातीसाठी जवळपास 75 टक्के अनुदान देण्यात येईल, तर उर्वरित 25% रक्कम लाभार्थ्याला स्वहिस्सा म्हणून भरावी लागेल. सर्वसाधारण प्रवर्गासाठी अनुदानाची ही मर्यादा 50 टक्के असेल. उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थ्यांना स्वहिस्सा म्हणून करावा लागेल.
नाविन्यपूर्ण योजना शेवटची तारीख
चालू वर्षात Navinya Purna Yojana अंतर्गत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख (Last Date) 8 डिसेंबर 2023 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीत पात्र शेतकरी किंवा पशुपालकांनी जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा कॉमन सर्विस सेण्टरला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा.
नाविन्यपूर्ण योजना अर्ज कसा करावा?
नाविन्यपूर्ण योजनाअंतर्गत चालू वर्ष 2023 मध्ये अर्ज करण्यासाठी Mahabms च्या अधिकृत वेबसाईटवर Online Application Form भरावा लागेल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 8 डिसेंबर 2023 देण्यात आलेली आहे.

नाविन्यपूर्ण योजना टोल फ्री क्रमांक
पशुसंवर्धन विभागामार्फतच्या संबंधित योजनेचा लाभ मिळवत असताना लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास किंवा शंका-कुशंका असतील, तर मोफत टोल-फ्री क्रमांक संपर्कासाठी सुरू करण्यात आलेला आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी अर्जदार खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
- कॉल सेंटर क्रमांक – 1962 (सकाळी 10 ते 6)
- टोल फ्री क्रमांक – 18002330418 (सकाळी 8 ते 8)
FAQ
1. नाविन्यपूर्ण योजना काय आहे ?
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालक व शेतकऱ्यांना 50 ते 75 टक्के अनुदानावर शेळी, मेंढी, गाय व म्हैस गट वाटप करणारी महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना होय.
2. नाविन्यपूर्ण योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे ?
सर्वप्रथम पात्र अर्जदारांना महाबीएमएस या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला द्यावी लागेल, त्यानंतर अर्जदाराच्या आवश्यकतेनुसार विविध प्रकारच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना देण्यात आलेल्या आहेत. त्याअंतर्गत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करता येईल.
3. नाविन्यपूर्ण योजनेसाठी किती अनुदान देण्यात येतं ?
नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत सामान्यता अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान देण्यात येतं, तर याउलट खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्केपर्यंत अनुदान दिलं जातं.
Source link