टेक्नोलॉजी माहिती

ॲपलचा नवा मॅक मिनी व iMac सादर : आता M4 व M4 Pro सह! – MarathiTech

ॲपल त्यांच्या मॅक-केंद्रित घोषणांच्या आठवड्याचा एक भाग म्हणून, आता एक छोटा परंतु आणखी शक्तिशाली Mac Mini सादर केला आहे. पहिली गोष्ट जी तुमच्या लक्षात येईल ती म्हणजे नवीन डिझाइन. याबद्दल बरीच चर्चा सुरू होती की मॅक मिनीचा आकार कमी केला जाईल. आता याची लांबी आणि रुंदीमध्ये फक्त पाच इंच आहे! त्यामुळे हा नवा मॅक मिनी तळहातावर मावू शकतो!

आता यात ॲपलचे नवीन M4 सिलिकॉन आहे, प्रथमच रे ट्रेसिंगला सपोर्ट करतो आणि 16GB RAM सह येतो. आता ॲपलच्या प्रत्येक नव्या उपकरणात Apple Intelligence देण्यात येत असल्यामुळे 16GB रॅम कदाचित सरतेशेवटी ॲपलने बेस मॉडेलमध्ये देण्यास सुरुवात केली असे दिसते. यामध्ये पुढे दोन Type C पोर्ट आणि एक हेडफोन जॅक आहे. मागच्या बाजूला Ethernet, 3 Thunderbolt/Type C पोर्ट, HDMI पोर्ट मिळेल.

मॅक मिनीची किंमत M4 चिपसह ₹५९९०० वर सुरू होते, तर अधिक शक्तिशाली M4 Pro मॉडेलची किंमत ₹१,४९,९०० आहे. काल जाहीर केलेल्या अपडेटेड iMac प्रमाणे, Mac Mini देखील त्वरित प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे आणि 8 नोव्हेंबर रोजी स्टोअर्समध्ये उपलब्ध होईल.

iMac च्या नव्या मॉडेल्समध्ये मात्र फारसा फरक दिसलेला नाही. M1 चिपच्या जागी M4 चा समावेश आणि वायफाय, ब्ल्युटूथ वगळता नवं काहीच दिलेलं नाही. यामध्येही आता Apple Intelligence आणि 16GB रॅम मिळेल. याची किंमत ₹१३४९०० पासून सुरू होईल. यामध्ये फारसे बदल नसले तर जर तुम्ही या बजेटमधील नवा कॉम्प्युटर घेत असाल तर नक्कीच हा चांगला पर्याय आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​