Uncategorized

३ एप्रिलपासून तेंडोली महोत्सवाचे आयोजन

वार्ताहर /कुडाळ

तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने ३ ते ५ एप्रिल या कालावधीत तेथीलच श्री देव रवळनाथ पंचायतनच्या प्रांगणात “तेंडोली महोत्सव 2026” चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवातून महिलांना व विद्यार्थ्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे.3 एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता शोभा यात्रा, ६ वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा होणार आहे. कुडाळचे उद्योजक विजय प्रभू, पप्पू नाईक, जि. प. माजी सदस्य रणजित देसाई, जि. प. सदस्या आरती पाटील, पं. स. सदस्य मंगेश प्रभू, राजन नाईक, प्रसाद नाईक, राजू राऊळ, तेंडोली सरपंच अनघा तेंडोलकर, उपसरपंच आकाश मुणनकर व ग्रा. पं. सदस्य तसेच माजी सरपंच संदेश प्रभू, पोलीस पाटील संजय नाईक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.७ वाजता रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन, ७.३० वाजता वेशभूषा स्पर्धा लहान गट – वय ५ ते १४ वर्षे व मोठा गट – १४ वर्षावरील, रात्री १० वाजता श्री तारादेवी मंडळ (केळूस) यांचे दोन अंकी विनोदी नाटक, ४ रोजी सकाळी ८ वाजता आरोग्य शिबीर, सायंकाळी ४ वाजता हळदीकुंकू कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता खेळ पैठणी कार्यक्रम, रात्री ८ वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा: लहान गट-वय ५ ते १४ वर्षे,मोठा गट – वय १४ वर्षावरील, ५ रोजी सायंकाळी ६ वाजता एकपात्री अभिनय स्पर्धा: लहान गट – वय ५ ते १४ वर्षे, मोठा गट – वय १४ वर्षावरील,रात्री ८ वाजता पारितोषिक वितरण,९ वाजता सई एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि चिमणी पाखरं डान्स अॅकॅडमी, यांच्या नृत्याविष्काराने नटलेला ‘बेधुंद जल्लोष’ ऑर्केस्टा होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन तेंडोली ग्रामस्थांनी केले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​