सरकारी योजना

सॅमसंगचा फोन वापरत असाल तर व्हा सावधान! सरकारने दिली वॉर्निंग, लगेच करा हे काम!


Samsung Big News : सॅमसंगचे मोबाईल वापरणाऱ्यांना सरकारी यंत्रणा असलेल्या CERT-In या संस्थेने हाय रिस्क वॉर्निंग दिली आहे. CERT-In म्हणजेच Computer Emergency Response Team of India, ही यंत्रणा मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत काम करते. या यंत्रणेचं काम इंटरनेटशी जोडल्या गेलेल्या सिक्युरिटी रिस्कबाबत अलर्ट करणं हे आहे.

एजन्सीने व्हलनरेबिलिटी नोट CIVN-2023-0360 मध्ये सॅमसंग मोबाईल वापरणाऱ्यांसाठी वॉर्निंग दिली आहे. हा इशारा ऍण्डरॉईड 11, ऍण्डरॉईड 12, 13 आणि ऍण्डरॉईड 14 असणाऱ्या फोनसाठी आहे. हे फोन त्यांच्यात असलेल्या व्हलनरेबिलिटीमुळे अतिधोकादायक असल्याचं CERT-In या यंत्रणेनं सांगितलं आहे.

 

महाराष्ट्रातील या पाच सहकारी बँकावर कारवाई; लाखो ग्राहकांसाठी मोठी बातमी

 

का देण्यात आली वॉर्निंग?

या फोनमध्ये असलेल्या कमीमुळे हॅकर्सना तुमच्या फोनची सिक्युरिटी तोडणं सोपं होतं, तसंच हॅकर्स फोनमधली संवेदनशील माहिती ऍक्सेस करू शकतात. CERT-In च्या माहितीनुसार सॅमसंगच्या फोनमध्ये Knox सिक्युरिटी फिचर्सचा चुकीचा ऍक्सेस, फेशियल रेकगनिशन सॉफ्टवेयरमध्ये कमी, AR इमोजी ऍपमध्ये अडचणी, अनेक मेमरी करप्शन व्हलनरेबिलिटी आणि दुसऱ्या चुका दिसून आल्या Samsung Big News.

असा करा बचाव

या धोक्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी सिक्युरिटी अपडेटचं लेटेस्ट व्हर्जन इनस्टॉल करा. यासाठी तुम्हाला सेटिंग्समध्ये जावं लागेल, जिथे सॉफ्टवेअर अपडेटचा पर्याय असेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाऊनलोड आणि इन्सटॉलवर क्लिक करावं लागेल. तुम्ही लेटेस्ट सिक्युरिटी अपडेट इन्सटॉल केला नसेल तर तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल, जेव्हा तुम्ही एखादं अनोळखी ऍप इनस्टॉल करता तेव्हा.

मोबाईलमध्ये असलेली सगळी ऍप्सना अपडेट करा. ऍपच्या जुन्या व्हर्जनमध्ये अनेक बग्स आणि व्हलनरेबिलिटीज असतात, ज्यामुळे कंपनी अपटेड आणतात, त्यामुळे तुम्हाला फोनसोबत ऍप्सही अपडेट कराव्या लागतात Samsung Big News.

 

टी-20 वर्ल्डकपचे टाइमटेबल जाहीर; टीम इंडियात रोहित-कोहली दोघांनाही जागा मिळाली

 

कोणत्या फोनवर होणार परिणाम?

CERT-In च्या माहितीनुसार हे धोके ऍण्डरॉईड 11, ऍण्डरॉईड 12, 13 आणि ऍण्डरॉईड 14 वर असलेल्या सगळ्या सॅमसंग मोबाईलवर दिसून आले आहेत. तुमच्याकडे या ब्रॅण्डचे बजेट फोन किंवा नवीन असलेला सॅमसंग गॅलेक्सी S23 सीरिज, Z Flip 5 आणि Galaxy Z Fold 5 हे महागडे फोन असले तरी तुमचा फोन लगेच अपडेट करून घ्या.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​