सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणीच्या सदस्यपदी अनिल भिसे बिनविरोध

सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची विशेष सर्वसाधारण सभा आज ”पर्णकुटी” शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीवर तालुका पत्रकार संघाचा प्रतिनिधी निवडण्याबाबत चर्चा करून ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा कार्यकारणीचे तत्कालीन सहसचिव तथा सदस्य कै. प्रवीण मांजरेकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी तालुका पत्रकार संघाचा प्रतिनिधी निवडण्याबाबत आज सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल भिसे यांची या जागी बिनविरोध व एकमताने निवड करण्यात आली. श्री. भिसे यांना यावेळी पत्रकार संघाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ज्येष्ठ पत्रकार विजय देसाई, उमेश सावंत, विनायक गांवस, हरिश्चंद्र पवार, मंगल नाईक-जोशी, अमोल टेंबकर, ॲड. संतोष सावंत, अभिमन्यू लोंढे आदींनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन रेडकर म्हणाले, कै. प्रवीण मांजरेकर यांच्या निधनाने निर्माण झालेली उणीव भरून न येणारी आहे. मात्र, त्यांचे सहकारी असणारे अनिल भिसे त्यांच कार्य निश्चितच पुढे घेऊन जातील. त्यांच्याकडे ते व्हिजन असून तालुका पत्रकार संघाची समर्थ साथ त्यांना सदैव राहील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हा कार्यकारीणीचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, तालुका सचिव विजय राऊत, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सह सचिव विनायक गांवस ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सागर चव्हाण,सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, माजी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, विजय देसाई, पत्रकार उमेश सावंत, काका भिसे, दीपक गांवकर, रूपेश हिराप, जतिन भिसे, प्रसन्न राणे, मंगल नाईक-जोशी, अनुजा कुडतरकर, भुवन नाईक, प्रणव तारी आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव यांनीही अनिल भिसे यांची भेट घेत अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुक्यातील अन्य पत्रकार देखील उपस्थित होते.
Source link



