Uncategorized

सावंतवाडीत १० एप्रिलला जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा

खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य

सावंतवाडी : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १० एप्रिल रोजी जिमखाना मैदान सावंतवाडी येथे संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६ जिल्हा स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती नगरपालिकेचे आरोग्य सभापती तथा भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी दिली .खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस सावंतवाडीत मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन संदर्भात बैठक झाली यानंतर श्री आडिवरेकर यांनी स्पर्धेसंदर्भात माहिती दिली. जिल्हास्तरीय भव्य टेबल टेनिस स्पर्धा घेण्यात येणार आहे. टेबल टेनिस स्पर्धा १३ वर्षाखालील मुला -मुलींसाठी असून प्रथम पारितोषिक रोख रुपये ३ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक २ हजार रुपये,१७ वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम/ द्वितीय ३०००/२०००,खुला गट मुले/मुली ५०००/३०००,दुहेरी खुला गट ६०००/४००० पारितोषिक असणार आहे. यावेळी शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर ,सरचिटणीस दिलीप भालेकर , हितेन नाईक, नगरसेवक प्रतीक बांदेकर , संकेत राऊळ, शुभम मुळीक,अक्षय पंडित आदी उपस्थित होते. इच्छुकखेळाडूंनी नावनोंदणी साठी पंकज तुळसुळकर +91 91306 83472
भाजपा कार्यालय 7875525496 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री आडिवरेकर यांनी केले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​