Uncategorized

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ अध्यक्षपदी अंकुश केसरकर

बैठकीत सर्वानुमते निर्णय : नूतन कार्यकारिणीचीही निवड

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अंकुश केसरकर यांची निवड करण्यात आली. रविवारी जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्ष तसेच नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या बेळगावच्या पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला शिस्त आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. प्रारंभी मंडळाचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी जमा-खर्च सादर केला. त्याचबरोबर यावर्षीच्या शिवजयंतीसंदर्भात कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. शिवजयंती मिरवणुकीचा मार्ग तसेच मागील वर्षी आलेल्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी या संदर्भात आपल्या सूचना मांडल्या. मागील वर्षी बापट गल्ली व कांगली गल्ली शिवजयंती उत्सव मंडळाने एकाच ठिकाणी मंडप घालून देखावे सादर केले. यामुळे वेळ तर वाचलाच तसेच अधिक चांगल्याप्रकारे देखावे पाहता आले. यावर्षीही तसा प्रयोग व्हावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

शिवजयंती मिरवणूक वेळेत सुरू करा

छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य इतिहास पुढच्या पिढीला समजावा यासाठी चित्ररथ मिरवणुकीमध्ये शिवचरित्रातील प्रसंग सादर केले जातात. सजीव देखावे हे बेळगावच्या शिवजयंतीचे वैशिष्ट्या आहे. त्यामुळे केवळ बेळगावच नाही तर आसपासच्या भागातील शिवप्रेमी नागरिक मिरवणूक पाहण्यासाठी येतात. त्यामुळे चित्ररथ मिरवणूक वेळेत सुरू केल्यास लहान मुलांसह महिलांनाही ती पाहता येईल. प्रत्येक मंडळाने चित्ररथ मिरवणूक लवकर काढून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी सागर पाटील, रणजीत चव्हाण-पाटील, संतोष कृष्णाचे, मदन बामणे, श्रीकांत कदम, अभिजीत मजुकर यासह इतर कार्यकर्त्यांनी विचार मांडले. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अंकुश केसरकर म्हणाले, बेळगावमधील शिवजयंतीला एक इतिहास आहे. त्यामुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला शिस्त आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केला जाईल. माझ्यावर टाकण्यात आलेला विश्वास सार्थकी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले. युवावर्गाच्या खांद्यावर शिवजयंतीची धुरा देण्यात आली आहे. त्यांनी ती योग्यप्रकारे सांभाळावी, अशा शुभेच्छा प्रकाश मरगाळे यांनी दिल्या.

अशी असणार नवीन कार्यकारिणी

अध्यक्ष-अंकुश केसरकर, उपाध्यक्ष-बाळाराम पाटील, रमेश पावले, प्रकाश पाटील, गणेश दड्डीकर, शिवाजी मंडोळकर, मोहन बेळगुंदकर, महेश जुवेकर, व्यंकटेश शहापूरकर, शुभम शेळके, लक्ष्मण होनगेकर, कार्यवाह-मदन बामणे व शिवराज पाटील, सहकार्यवाह- अॅड. अमर यळ्ळूरकर, दिगंबर पवार, शिवाजी हंगिरगेकर, कपील भोसले, खजिनदार-प्रकाश मरगाळे, हिशेब तपासणीस-राजू मरवे, सल्लागार-मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, विजय पाटील, किरण जाधव, रणजीत चव्हाण-पाटील याबरोबरच स्पर्धा प्रमुख तसेच नियंत्रण मंडळाची निवड करण्यात आली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​