Uncategorized

भ्रष्टाचाराची कमाल…अभियंता मालामाल

लोकायुक्तच्या छाप्यात 14 कोटी रुपयांचे घबाड हस्तगत : अधिकाऱ्यांकडून माहिती

बेळगाव : बेळगाव जिल्हा नगरविकास कक्षचे साहाय्यक कार्यकारी अभियंते अजयसिंग बापूसिंग रजपूत यांच्या घरांवर चार दिवसांपूर्वी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. या कारवाईत 14 कोटी रुपयांचे घबाड उघडकीस आले आहे. शुक्रवारी लोकायुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे यासंबंधी माहिती दिली आहे. मंगळवार दि. 7 एप्रिल रोजी अजयसिंग रजपूत यांच्यासंबंधी विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. लोकायुक्त पोलीसप्रमुख प्रसन्न देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरंजन पाटील, गोविंद गौडा, रवी मावरकर, राजू पाटील, अभिजित जमखंडी आदींचा समावेश असलेल्या पथकाने केलेल्या तपासणीत 14 कोटी रुपयांहून अधिक घबाड उघडकीस आले आहे.

बेळगाव शहरात 3 घरे, सौंदत्ती, हुक्केरी, हुबळी आदी ठिकाणी पाच भूखंड, 5 किलो 960 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने, 3 कोटी 12 लाख रुपयांच्या एफडी, एक कार, बाईक आदी मालमत्ता उघडकीस आली आहे. अधिकाऱ्यांनी या कारवाईत रोकडही ताब्यात घेतली आहे. लोकायुक्त विभागाने शुक्रवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. नगरविकास कक्षाच्या साहाय्यक कार्यकारी अभियंत्याकडे जवळजवळ 6 किलो सोने व हिऱ्याचे दागिने आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. ही चौकशी अद्याप सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​