Uncategorized

भारतासाठीची तेलनौका वळली चीनकडे

भारताकडून होणार चौकशी, कारणे शोधली जाणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

इराणचे कच्चे इंधन तेल भारताकडे घेऊन येणाऱ्या नौकेने वाटेतच आपला मार्ग बदलून ती चीनकडे वळल्याची घटना घडली आहे. या नौकेवर एस्वातिनीचा ध्वज आहे. पिंग शन असे या नौकेचे नाव आहे. या नौकेवरुन देण्यात आलेल्या संदेशानुसार ती भारताच्या वाडिनार बंदरात 4 एप्रिलला पोहचणार होती. तथापि, होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून ती मोठ्या सागरात आल्यानंतर तिने अचानक आपला मार्ग परिवर्तीत केला आणि ती चीनकडे जाऊ लागल्याची माहिती आहे.

या नौकेने अचानक आपला मार्ग का बदलला, याची अनेक कारणे असू शकतात, असे अनेक तज्ञांनी स्पष्ट केले आहे. वास्तविक या नौकेने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली होती आणि तिने आवश्यक ती अनुमतीपत्रेही मिळविली होती. या नौकेच्या ट्रान्सपाँडर्समधून भारताला संदेशही देण्यात आला होता. ती 4 एप्रिलला, म्हणजे आज शनिवारी गुजरातमधील वाडिनार बंदरात पोहचणार होती. तथापि, कोणतेही कारण स्पष्ट न करता तिने मार्ग बदलला आहे.

अधिक पैसे देण्यात आल्याने…

या नौकेच्या भाड्यापोटी भारताने जी रक्कम देऊ केली होती, तिच्यापेक्षा जास्त रक्कम चीनने देऊ केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ही नौका भारत सरकारची किंवा भारताच्या कोणत्याही कंपनीची नाही. ती विदेशी कंपनीची आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे जे तेल सध्या नौकांमध्ये आहे, ते विकण्यास त्या देशाला अनुमती दिली होती. त्यानुसार या तेलाची विक्री केली जात आहे. तथापि, ही नौका भारताकडे न येता, चीनकडे जाऊ लागल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणाची भारताकडून चौकशी केली जाणार आहे.

चिनी कंपनीची नौका

पिंग शन ही नौका चीनच्या नायसिटी शिप मॅनेजमेंट कंपनीची आहे. तिने काही दिवसांपूर्वी इराणच्या खार्ग बेटावर तेल भरुन घेतले होते. प्रथम या नौकेने चीनकडे जात असल्याचा संदेश दिला होता. तथापि, नंतर भारताकडे येत असल्याचा संदेश दिला. पण त्यानंतर ती चीनकडे जात असल्याचे दिसत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​