Uncategorized

बालाजी क्लब, बेळगाव लायन्स विजयी

एसआरएस हिंदुस्थान चषक

बेळगाव : एसकेई सोसायटीच्या प्लॅटिनम ज्युबिली क्रिकेट मैदानावर एसआरएस चषक टी-20 स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या विविध सामन्यात बालाजी स्पोर्ट्स व बेळगाव लायन्स क्रिकेट क्लब संघानी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजय संपादन केला. मिलिंद चव्हाण, व युसुफ यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना बालाजी क्रिकेट क्लबने 20 षटकात 3 बाद 220 धावा केल्या. मिलिंद चव्हाणने 5 षटकार, 13 चौकारांसह 111 धावांची शतकी खेळी केली व या स्पर्धेत सलग 2 शतके मारण्याचा मान मिळविला. राहुल नाईकने 28, प्रसाद नाकाडीने 21, धावांचे योगदान दिले. एडीफाय स्पोर्ट्सच्या शिवराज टी.ने 2 गडी, संदेश के. ने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एडीफाय स्पोर्ट्स क्लबने 20 षटकात 7 बाद 136 धावा केल्या. त्यांना हा सामना 84 धावांनी गमवावा लागला.

गौतम मेदारने 70, सुशांतने 17, हैदर अलीने 12 धावांचे योगदान दिले. बालाजी स्पोर्ट्सतर्फे अमोल वाय. व राहून नाईकने प्रत्येकी 2 गडी तर वैभव व मिलिंद चव्हाण यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेळगाव लायन्स क्लबने 20 षटकात 8 बाद 182 धावा केल्या. युसूफने 94, अश्विनी एसने 21, वाहिदने 14, सलिकने 11 धावांचे योगदान दिले. बेळगांव रॉयल्स क्रिकेट क्लबतर्फे करणने 3, प्रितेशने 2, स्टीफन व प्रसादने प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव रायल्स क्रिकेट क्लबने 20 षटकात 9 बाद 141 धावा जमवित सामना 80 धावांनी गमविला. प्रितेशने 29, माहेरने 22, गिरीशने 21, केदारने 16 धावांचे योगदान दिले. बेळगांव लायन्स अकादमीतर्फे गोलंदाजी करताना तारिक अहमद, सालिक पी. युसूफ यांनी प्रत्येकी 2 गडी तर ईश्वरने 1 गडी बाद केला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​