Uncategorized

फोंडा पोटनिवडणुकीसंदर्भात आज महत्त्वपूर्ण सुनावणी

पणजी : येत्या 9 एप्रिल रोजी होणाऱ्या फोंडा पोटनिवडणुकीला विरोध करणाऱ्या तीन याचिकांवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात काल बुधवारी दुसऱ्या दिवशीही अपूर्ण राहिली. दोन्ही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आज गुऊवारी एकेरी खंडपीठाचा दिवस असून खास द्विसदस्यीय खंडपीठ दुपारी 2.30 वाजता महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. सध्याच्या विधानसभेचा उर्वरित कार्यकाळ एका वर्षापेक्षा कमी आहे. फोंडा पोटनिवडणुकीतून निवडून येणाऱ्या आमदारास एक वर्षापेक्षा कमी कलावधी मिळणार आहे. याचिकाकर्त्यांनी दावा केला आहे की, यामुळे ’लोकप्रतिनिधित्व कायद्या’अंतर्गत पोटनिवडणुकांबाबत असलेल्या तरतुदींचे उल्लंघन होत आहे. यामुळे याचिकाकर्त्यांनी ही निवडणूक प्रक्रिया कायद्याच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन केले आहे. याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केला की, या निवडणुकीतून निवडून येणाऱ्या सदस्याला किमान एक वर्षाचा कार्यकाळ मिळणार नसल्याने ही पोटनिवडणूक रद्द करण्यात यावी.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​