Uncategorized

प्रमोद पालेकर, के.आर शेट्टी संघ विजयी

एसआरएस चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा: प्रणय शेट्टी, भूषण सी यांची आक्रमक फलंदाजी

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ आयोजित एसआरएस चषक टी-20 निमंत्रितांच्या थर्ड व फोर्थ डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून प्रमोद असलकर क्रिकेट अकादमीने बेळगाव लायन्स संघाचा 18 धावांनी तर के.आर शेट्टी संघाने गोल्डन स्टार संघाचा 77 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. प्रमोद असलकर, प्रणय शेट्टी यांना सामनावीर तर तारीक अहमद, मंजूर टी. यांना इम्पॅक्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात प्रमोद पालेकर संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 169 धावा केल्या.

भूषण सी.ने 5 षटकार, 3 चौकारांसह 50, प्रमोद असलकरने 4 चौकारांसह 27, अनिकेत भोसलेने 5 चौकारांसह 26, संतोष जाधवने 2 चौकारांसह 19 धावा केला. बेळगाव लायन्सतर्फे तारीक अहमदने 27 धावांत 2, वरध, अश्विन, शशी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव लायन्स संघाने 20 षटकांत 7 गडी बाद 147 धावा केल्या. सादीक सनदीने 3 षटकार, 2 चौकारांसह 37, तारीक अहमदने 1 षटकार 3 चौकारांसह 27, विनीत पाटीलने 2 चौकारांसह 23 तर सालीक पटवेगारने 31 धावा केल्या. प्रमोद पालेकर संघातर्फे प्रमोद असलकरने 24 धावांत 4 तर प्रशांत व सुमित यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दुसऱ्या सामन्यात केआर शेट्टी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी बाद 199 धावा केल्या. कर्णधार प्रणय शेट्टीने 4 षटकार, 3 चौकारांसह 68, राहुल शिंदेने 6 चौकारांसह 30, गुरूप्रसाद पी.ने 6 चौकारांसह 29 तर प्रशांत लायंदरने 4 चौकारांसह 26 धावा केल्या.गोल्डन स्टारतर्फे जीलानी दोडकर, अजिम शेख, सुनील व मंजूर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर गोल्डन स्टार संघाने 18.5 षटकांत सर्वगडी बाद 122 धावांत आटोपला. मंजूरने 4 चौकारांसह 24, अजिम शेखने 4 चौकारांसह 17, सौरभने 1 षटकार, 2 चौकारांसह 18, मैनुद्दीनने 2 चौकारांसह 16 धावा केल्या. के. आर शेट्टीतर्फे राहुल शिंदेने 23 धावांत 3, रब्बानी दफेदारने 24 धावांत 2, अक्षयने 36 धावांत 2 तर किरण तरळेकरने 1 गडी बाद केला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​