Uncategorized
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र लांबवले

कणकवली/ वार्ताहर: दर्शन सावंत
कामावरून घरी परतणाऱ्या एका ४३ वर्षीय महिलेचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन दुचाकीस्वारांनी भररस्त्यात हिसकावून नेले. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता आशिये -सोनगेवाडी परिसरात घडली. रिचा राजन रासम असे पीडित महिलेचे नाव असून, त्या क्लिनिकमधील काम संपवून घरी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी ‘काळे सर कुठे राहतात?’ असा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना थांबवले. काही कळायच्या आत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६ ग्रॅमचे मंगळसूत्र ओढले आणि कणकवलीच्या दिशेने पोबारा केला. या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Source link

