कोल्हापूर मार्केट यार्डात शुकशुकाट राहणार; सोमवार-मंगळवारी गुळाची आवक न करण्याचा निर्णय

कोल्हापूरच्या गुळावर संकट; गुजरातमध्ये बेमुदत बंद
कोल्हापूर – गुजरातमध्ये विकला जाणारा कोल्हापूरचा गूळ कलरयुक्त सापडल्याने, गुजरातमधील गूळ व्यापाऱ्यांनी, सोमवारपासून गूळ आपली दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात येथील गूळ व्यापाऱ्यांच्या निर्णयामुळे कोल्हापुरातील उत्पादक शेतकऱ्यांनीसुध्दा सोमवार आणि मंगळवारी मार्केट यार्डमध्ये गूळ आणणार नाहीत. शनिवारी झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील आणखी दोन गूळ व्यापारी असोसिएशनने व्यापाऱ्यांना पत्र पाठवले आहे.
सोमवार, १३ कलरयुक्त कोल्हापूरी गुळाबाबत तारखेपासून गुजरातमधील गूळ व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद सुरू होणार आहे. तसे पत्र जुना माधवपुरा व्यापारी महाजन (अहमदाबाद) आणि श्री पाटण गूळ असोसिएशन पाटण (उत्तर गुजरात) या गूळ संघटनेने कोल्हापूरच्याव्यापारी अहते यांना पाठवले आहे. शनिवारी गुजरातमधील विसनगर आणि महेसाणा या भागातील आणखी दोन गूळ व्यापारी असोसिएशनने कोल्हापूर गूळ खरेदी असोसिएशनला पत्र पाठवले आहे. लॅब टेस्ट केल्याशिवाय गूळ पाठवू नये, अशी सूचना त्यांनी केली आहे. यामुळे कोल्हापूरी गूळ गुजरातच्या बाजारपेठेत जाणार की नाही हा प्रश्न अनुत्तरीत होता.
गूळ खरेदी बंदमुळे कोल्हापुरी गुळाची बाजारपेठही थंड राहणार आहे.गुजरातमधील नेवाड गावामध्ये तेथील अन्न आणि औषध विभागाने केलेल्या गुळाच्या तपासणीमध्ये घातक कलरचा वापर केल्याचे आढळून आले आहे. हा कलर आरोग्यास घातक असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने संबधितांवर कारवाई केली आहे. याबाबत गुजरातमधील गूळ व्यापारी संघटनांनी कलरमुक्त आणि लॅब टेस्ट गूळ पाठवण्याची लेखी सूचना कोल्हापुरातील व्यापाऱ्यांना केली आहे.
सोमवार आणि मंगळवारी गूळ उत्पादकांनी बाजार समितीमध्ये गुळाची आवक न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन दिवस सौदे निघणार नाहीत. गुजरातच्या निर्णयावरच कोल्हापूरची दिशा ठरणार आहे. सौदे बंद, गुजरातमधील न विबस सोवे निघणार नाहीतगुजरात येथील लेखी पत्रे आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी शनिवारी बैठक झाली. या बैठकीत सोमवार आणि मंगळवारी गूळ उत्पादकांचा गूळ सौद्यासाठी बाजार समितीमध्ये येणार नाही. यामुळे सौदेसुध्दा निघणार नाही. –तानाजी दळवी, सचिव, शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर
Source link