केआर शेट्टी,बेळगाव लायन्स विजयी

भरत हुंदरे, हसन गोकाक इम्पॅक्ट खेळाडू : माजिद मकानदारचे 73 धावा,भरत हुंदरे व बसवंत एस.यांचे 3 बळी
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ आयोजित एसआरएस चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव लायन्सने अर्णव सीसीचा तर के.आर शेट्टीने एमसीसीसीचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. तारीक अहमद, मजिद मकानदार यांना सामनावीर तर भरत हुंदरे, हसन गोकाक यांना इम्पॅक्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. एसकेई मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात अर्णव सीसीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी बाद 165 धावा केल्या. अक्षितने 9 चौकारांसह 43, शुभमने 2 चौकारांसह 32, प्रथमेशने 1 षटकार, 3 चौकारांसह 29 तर गणेशने 1 षटकार, 2 चौकारांसह 22 धावा केल्या.
बेळगाव लायन्सतर्फे विनीत, तारीक व अश्विन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. त्यानंतर बेळगाव लायन्सने 18.3 षटकात 9 गडी बाद 166 धावा करून सामना एक गड्याने जिंकला. तारीक अहमदने 2 षटकार, 4 चौकारांसह 36, चेतनने 3 चौकारासह 35, झाकीरने 18 तर ईश्वरने 22 धावा केल्या. अर्णव सीसीतर्फे भरत हुंदरे व बसवंत एस. यांनी प्रत्येकी 3 तर रघु व शुभम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात केआर शेट्टीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी बाद 216 धावा केल्या. मजिद मकानदारने 6 षटकार, 6 चौकारांसह 73, गुरुप्रसादने 1 षटकार, 6 चौकारांसह 41, प्रशांत लायंदरने 1 षटकार, 4 चौकारांसह 38 तर राहुल शिंदेने 2 षटकार, 4 चौकारांसह 36 धावा केल्या. एमसीसीसीतर्फे सचिनने 35 धावात 2 तर दादापीर हाजीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसीसीने 20 षटकात 6 गडी बाद 128 धावा केल्या. हुसेन गोकाकने 1 षटकार, 6 चौकारांसह 33, एन. बी. पाटीलने 2 षटकार, 5 चौकारांसह 38 तर दादापीर हाजीने 6 चौकारांसह 31 धावा केल्या. केआर शेट्टीतर्फे अक्षितने 14 धावात 2, माजिद मकानदारने 15 धावात 2, अक्षय व राहुल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
Source link

