Uncategorized

कसाल शिक्षण संस्थेच्या संचालकपदी प्रभाकर सावंत यांची बिनविरोध फेरनिवड

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

शैक्षणिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या संचालकपदी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे.

कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कसाल हायस्कुलच्या गुरुदक्षिणा सभागृहामध्ये मावळते अध्यक्ष भाई सावंत याच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी 2026 ते 2031 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक पार पडली.यामध्ये प्रमुख्याने कसाल शिक्षण संस्थेला शैक्षणिक सुविधा निर्माण करून देण्यास महत्वाची भूमिका बजावणारे संस्थेचे विश्वस्त प्रभाकर सावंत (रानबांबुळी) यांची संचालकपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.

त्याचबरोबर संस्थेच्या संचालकपदी अवधूत Konkan , नवीन बांदेकर , पंचायत समिती सदस्य बाळा कांदळकर ( तिन्ही कसाल) आणि सचिन कदम हे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आले तर प्रभाकर सावंत- रानबांबुळी, आशिष परब- खोटले, येंडे सर- बोर्डवे, बबली राणे- ओसरगाव ,नंदू गावडे-हेदुळ, सत्यवान चव्हाण – पडवे, मनीष पारकर – ओरोस यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​