‘ईयू’तील राजदूतपदी प्रणय वर्मा

बेल्जियमचे देखील राजदूत : बांगलादेशात सांभाळली आहे धुरा
वृत्तसंस्था नवी दिल्ली
बांगलादेशात भारताचे राजदूत असलेले प्रणय वर्मा यांची भारत सरकारने बेल्जियममध्ये बदली केली आहे. प्रणय वर्मा आता बेल्जियममध्ये भारताचे पुढील राजदुत म्हणून काम पाहतील. तसेच युरोपीय महासंघात ते भारताचे राजदूत म्हणूनही जबाबदारी सांभाळतील.
वर्मा यांना युरोपीय महासंघात भारताचे राजदूत म्हणूनही मान्यता प्राप्त असेल. तर बांगलादेशात भारताच्या नव्या राजदूताची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधानांची भेट
भारताचे राजदूत प्रणय वर्मा यांनी सोमवारीच पंतप्रधान तारिक रहमान यांची भेट घेतली होती. तसेच गुरुवारी तारिक रहमान यांचे सुरक्षा सल्लागार ब्रिगेडियर जनरल डॉ. ए.के.एम शमशुल इस्लाम यांची भेट घेतली होती. यादरम्यान दोघांनी भारत-बांगलादेश संबंध वृद्धींगत करण्याच्या महत्त्वावर जोर दिला होता. तारिक रहमान यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान भारत-बांगलादेशच्या हितांशी निगडित मुद्द्यांवर चर्चा झाली.
प्रणय वर्मांचा कार्यकाळ
?प्रणय वर्मा यांना जुलै 2022 मध्ये बांगलादेशातील राजदूत म्हणून नियुक्त केले होते.
?बांगलादेशात वर्मा यांच्या कार्यकाळादरम्यान दोन्ही देशांचे संबंध अत्यंत उतारचढाव युक्त राहिले.
?खासकरून शेख हसीना यांच्या निर्वासनानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये मोठी कटूता निर्माण झाली होती.
-बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर हल्ले, सीमा वाद यासारख्या मुद्द्यांमध्ये वर्मा यांनी सक्रीय भूमिका बजावली आहे.
-बांगलादेशात तारीक रहमान यांचे सरकार आल्यावर वर्मा यांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला होता.
Source link


