Uncategorized

आंबोलीत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे उद्घाटन

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे आयोजन

आंबोली प्रतिनिधी

आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना घडविण्यासाठी लहानपणापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होणे गरजेचे आहे . शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षेतून भविष्यातील मोठ्या केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचे बीजारोपण होईल. या परीक्षेतुनच पुढे जावून ग्रामीण भागातील अधिकाधिक मुले अधिकारी होतील, असा विश्वास अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष म. ल. देसाई यांनी व्यक्त केला.अखिल प्राथमिक शिक्षक संघ यांच्यावतीने पब्लिक स्कूल, आंबोली मूळवंदवाडी येथील पब्लिक स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या इ.४थी/७वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या उद्घाटन प्रसंगी म ल देसाई बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आंबोली चौकुळ पंचायत समितीचे सदस्य मायकल डिसोजा, आंबोली केंद्रप्रमुख व संघटनेचे सल्लागार आर बी गावडे, सावंतवाडी तालुका माजी सचिव गुरुनाथ राऊळ, संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष संजय शेडगे, अध्यक्ष विजय गावडे, संघटनेचे ज्येष्ठ सदस्य बाबा गुरुजी, डॉ. चंद्रकांत सावंत व आंबोली चौकुळ केंद्रातील संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांनी संघाच्या स्पर्धा परीक्षेतील विविध उपक्रमांबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तालुकाध्यक्ष विजय गावडे यांनी संघाच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा हेतू व उद्देश सांगून आंबोली- चौकुळ केंद्रातील प्रत्येक शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अखिल परिवार सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली. यावेळी आंबोलीचे केंद्रप्रमुख आर्. बी. गावडे यांनी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आंबोली पंचायत समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मायकल डिसोझा यांचा संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे माजी तालुकाध्यक्ष संजय शेडगे, गुरुनाथ राऊळ, माजी तालुका उपाध्यक्ष कृष्णा गावडे, डाॅ. चंद्रकांत सावंत , तालुका सहसचिव विजय शिंदे, विद्याधर पाटील, जिल्हा संघटक रुपाली मोरे, अनिलकुमार चाळूचे, गणपती पाटील, अमोल कोळी, शामराव मोरे, सचिन कोकितकर, अवधूत जाधव, गोविंद पाटील, वसुंधरा देसाई, अनिता कतगर आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्. बी. गावडे यांनी, सूत्रसंचालन विजय शिंदे यांनी तर आभार गणपती पाटील यांनी मानले. यावेळी आंबोली, चौकुळ, गेळे गावातील विद्यार्थी, शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. यावर्षी नव्याने सुरू झालेल्या ४थी /७वी परीक्षेच्या सरावासाठी आंबोलीत सर्वप्रथम सराव परीक्षेचे आयोजन केल्याबद्दल अखिल परिवाराच्या विद्यार्थी हिताच्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. यावेळी आंबोली, चौकुळ, गेळे गावातील विद्यार्थी, शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​